पारोळ्यात आनंद चौदस निमित्त भगवान अनंतनातजीची मिरवणूक

विविध घोषणांनी दुमदुमले परिसर

बातमी शेअर करा...

पारोळा

येथील हत्ती गल्लीतील जैन मंदिरातुन पर्यषण महापर्व निमित्त श्री 1008 अनंतनाथ भगवानजीची रथावरून मिरवणूक करण्यात आली.

दिनांक १८ रोजी सकाळी चांदीच्या रथा मध्ये १००८ अनंतनाथ भगवान यांची प्रतिमा विराजमान करण्यात आल्या नंतर डि जे च्या गजरात भव्य मिरवणूकीला सरुवात करण्यात आली मिरवणूक गणपती चौक बालोदय व्यायम शाळा बालाजी मंदिर चौक , रथ चौक , गुजराती गल्ली त्रिमूर्ती चौकातुन विद्यासागरजी त्यागी भवन येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली . मिरवणुकी . दरम्यान डि . जे च्या तालावर गरबाच्या नृत्यात महिलांनी गरबा खेळून आंनद घेतला . मिरवणुकीत विविध घोषनानी परिसर दुमदुमून गेला होता . त्यागी भवन मध्ये भगवानजीचे अभिषेक करण्यात आले . मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी प्रतिमेची आरती करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती . रथा ला ओढण्यासाठी व आरतीने पुजन करण्यासाठी भगवे वस्त्र परिधान केलेल्या ( सोहळ्या मधील ) यांनाच परवानगी होती . मिरवणुकीत जैन ट्रस्टी , जैन नवयुवक , महिला मंडळ , समाज बांधव व भगिनी , युवक , युवती मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते . या वेळी पोलिसाचा चोख बंदोबस्त होता .

 

श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात दीडशे वर्षाच्या परंपराप्रमाणे याही वर्षी पर्यषण महापर्व आनंदात व उत्साहात संपन्न झाला समाजातील अनेक भक्तांनी उपवासाचे व्रत केले त्यात पंकज उमेशचंद्र जैन यांनी एक महिना सोलहकारण व्रत केले ते पारोळा दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष उमेशचंद्र रमणलाल जैन यांचे लहान सुपुत्र आहे .तसेच कु श्रुती पियुष जैन ,आदेश हितेंद्र जैन तनयकुमार संजयजी जैन व संजय गमनलाल जैन , शैलेश सुरेश जैन यांनी दहा दिवसाचे तर काहींनी पाच दिवसाचे उपवास केले एक दिवसीय उपवास अनेक भक्तांनी केले . समाजाच्या वतीने प्रत्येकाला प्रमाण पत्रक देण्यात आले.तद्पुर्वी दिनांक १७ रोजी संपूर्ण मंदिरातील सर्व प्रतिमेचे पंचामृत अभिषेक करण्यात आला. .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम