करीनामुळे अनन्या झाली ट्रोल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० ऑक्टोबर २०२२ । बॉलिवूडमध्ये नेहमीच सोशल मिडीयावर चाहते ट्रोल करताना कुणालाही आता ते नवल वाटणार नाही, नुकतीच दिवाळी पार्टी झाल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये हॅलोविन पार्टी सुरु आहे. काल याच पार्टीत अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. यात शनाया कपूर, नव्या नवेली नंदा आणि सारा अली खान यांच्यासह अनन्या पांडेही पार्टीत सामील होती. अनन्याने शनिवारी हॅलोविन पार्टीसाठी गुलाबी टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला होता. ज्यामूळे ती जोरदार ट्रोल झाली आहे.

तिने करिनाच्या पू किंवा पूजाच्या पात्रापासून प्रेरणा घेत हा ड्रेस घातला होता. त्यामुळे तिने करिनाची कॉपी केल्याचं नेटकरी म्हणाले. तिच्या व्हिडिओवर कंमेट करत तिला कॉपी कॅट म्हटले आहे. करिना कपुरचा कभी खुशी कभी गम मधला ड्रेस चोरल्याचं तिला म्हटलं आहे. तर कोणी तिला या पिढिची करिना म्हटंलय.

तर दुसरीकडे, करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पार्टीतील अनन्या पांडेच्या फोटोंचा कोलाज शेअर करत लिहीलेय, “तू PHAT दिसत होतास (विंक इमोजी). वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टार, खूप प्रेम!” PHAT म्हणजे Pretty, Hot And Tempting’. अनन्या आज तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

 

अनन्याने करिनाला कॉपी करण्याची हि पहिलीच वेळ नाही तर 2020 मध्येही अनन्या करिनाच्या व्हॉट वुमन वॉन्ट या चॅट शोमध्ये सिल्वर जॅकेटमध्ये दिसली. या ड्रेसच्या मागच्या बाजूला करीनाचा पू लूक छापलेला होता. तिने करीनाला विचारले, “मी तुला सांगू का आज माझ्या लूकमागे काय आहे? कारण मला वाटते की ते खूप रोमांचक असेल. त्यामूळे मी बनवलेले हे जॅकेट मला तुला दाखवायचे आहे.” तिने त्या जॅकेटची बाजू दाखवली ज्यावर करीनाचा डायलॉग होता, ‘गुड लुक्स,गुड लुक्स आणि गुड लुक्स’ असे लिहिलेले होते आणि पुढच्या बाजूला ‘P.H.A.T- Pretty, Hot And Tempting’ लिहिले होते. हेच आज करिनाने तिच्या फोटोला दिले आहे.

अनन्या नुकतीच विजय देवरकोंडासोबत लिगरमध्ये दिसली होती. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट चांगलाच आपटला. ती सध्या तिच्या ‘खो गये हम कहाँ’ या तिच्या आगामी चित्रपटावर काम करत आहे. यात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याही भूमिका आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम