नाराज खा.अमोल कोल्हेनी मांडली भूमिका !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  देशात भाजप व कॉंग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांच्यावर अमोल कोल्हे नाराज या सतत होणाऱ्या प्रश्नाबद्दल विचारला असता त्यावरही त्यांनी माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का असा प्रतिसवाल पत्रकारांना केला.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले खासदार कोल्हे यांना त्यांच्या नाराजीवर प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी मी नाराज नाही असे सांगितलं. तर नियोजित कार्यक्रमामुळे राजकीय कार्यक्रमांना अनुपस्थित असतो असाही खुलासा कोल्हे यांनी केला. तर यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील पिंपरी चिंचवडमध्ये स्पष्टीकरण दिल्याचे ते म्हणाले. तर काही कलेची कमिटमेंट असेल कलाक्षेत्राची काही कमिटमेंट असेल, नाटकाचा प्रयोग असेल तर त्यावेळी कदाचित राजकीय कार्यक्रमासाठी मी अनुपस्थित असतो. मात्र लगेच हेडलाईन सुरू होते अमोल कोल्हे नाराज. पण असं काही नाही… मी नाराज नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम