देशातील हिंदू संतप्त : युक्रेनने मागितली माफी !
दै. बातमीदार । २ मे २०२३ । देशभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उमटली असल्याची बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटवर हिंदू देवी कालीच्या मूर्तीचा आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधीकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो ट्विट केल्यामुळे भारतीय विशेषतः हिंदू संतप्त झाले होते. दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्र्यांने या प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे.
युक्रेनचे परराष्ट्र व्यवहारांचे प्रथम उपमंत्री एमीन झेपर म्हणाल्या, “युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटवर हिंदू देवी कालीच्या मूर्तीची खंडित प्रतिमा सादर केल्याबद्दल आम्हाला खेद होत आहे. युक्रेन आणि तेथील लोक अद्वितीय भारतीय संस्कृतीचा आदर करतात आणि भारताच्या समर्थनाची प्रशंसा करतात. तो आक्षेपार्ह फोटो आधीच काढून टाकण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतातील ट्विटर वापरकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या गेल्या होत्या. नेटकऱ्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हमें यूक्रेन के रक्षा मंत्रालय के ट्वीट पर हिंदू देवी काली की मूर्ति की खंडित प्रतीमा पेश करने के लिए खेद है। यूक्रेन और इसके लोग अद्वितीय भारतीय संस्कृति का सम्मान करते हैं और भारत के समर्थन की अत्यधिक सराहना करते हैं। चित्रण को पहले ही हटा दिया गया है: यूक्रेन के विदेश मामलों… pic.twitter.com/Kt6cTgexPV
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2023
@DefenceU या अधिकृत ट्विटर हँडलने ३० एप्रिलला ट्विट केलेला फोटो ‘वर्क ऑफ आर्ट’ या कॅप्शनसह शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये माँ कालीची प्रतिमा ही हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोच्या पोजमध्ये दाखवण्यात आली होती. स्फोटातून निघालेल्या धुरात माँ कालीचा चेहरा मर्लिन मनरोसारखा दिसत आहे. त्यांची जीभ बाहेर आहे आणि त्याच्या गळ्यात कवटीचा हार दिसत आहे. या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात होता
भारतातील संतप्त नेटिझन्सनी हा प्रकार आक्षेपार्ह आणि ‘हिंदूफोबिक’ असल्याचे म्हटले होते. भारतातील अनेक संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनी थेट हा फोटो थेट ट्विटर सीईओ इलॉन मस्क आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग केला होता. तसेच युजर्सनी या दोघांकडे युक्रेनवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम