चाहत्यांना अनिल कपूर दाखविणार झलक?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२  अभिनेते अनिल कपूर यांनी एशियन पेंट्स व्हेअर द हार्ट इजच्या नवीन भागात चाहत्यांना त्यांच्या घराची झलक दाखवणार आहेत. या एपिसोडमध्ये त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसणार आहे.

सुरुवातीला अनिल करपूर यांनी येथे एक अपार्टमेंट खरेदी केले होते, जे पहिल्या मजल्यावर होते. त्यानंतर त्यांनी त्याचा दुसरा, तिसरा मजला आणि आता ग्राउंड फ्लोअरही विकत घेतला. या व्हिडिओत ते आपल्या सुंदर घराविषयी सांगताना दिसत आहेत. अनिल यांनी सांगितले की, जेव्हा सोनम कपूरचा जन्म झाला तेव्हा ते पहिल्यांदा या घरात आला होते. ते पुढे म्हणाले की, ‘लोक बंगल्याचे रुपांतर इमारतीत करतात, पण माझ्यासाठी ते वेगळे होते.

मी इमारतीचे बंगल्यात रूपांतर केले.’ ते म्हणाले, ‘घर घेण्याचे स्वप्न होते, त्यामुळे हम पाचनंतर मिळालेल्या पैशातून आम्ही पहिले घर घेतले. सुनीता प्रेग्नंट होती आणि सोनमचा जन्म झाला आणि मग आम्ही इथे आलो. इथूनच आमच्या घराचा प्रवास सुरू झाला.’ व्हिडिओमध्ये अनिल यांनी त्यांचे आलिशान जिम, टेरेस गार्डन दाखवले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम