अनिल परब यांची संपत्ती जप्त ; ईडीनं केली कारवाई !
दै. बातमीदार । ४ जानेवारी २०२३ नव्या वर्षाचे शिवसेनेच्या ठाकरे गटाला धक्का देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा झटका दिला आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना हा झटका बसला आहे. कारण ईडीनं त्यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दापोली येथील साई रिसॉर्टच्या संबंधी ही संपत्ती आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ED has initiated an investigation under PMLA on the basis of a complaint filed by the Ministry of Environmental Forest and Climate Change against Anil Dattatray Parab: ED
— ANI (@ANI) January 4, 2023
साई रिसॉर्टशी संबंधीत प्रकरणात ईडीनं अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांची तीन ते चार वेळा चौकशी देखील झाली होती. याप्रकरणी पर्यावरण खात्यानं अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती.दरम्यान, ईडीच्या चौकशीतून हे समोर आलं आहे की, अनिल परब यांचं सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक एसडीओ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमीनीचं बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करत रिसॉर्टचं बांधकाम झालं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम