नागरिकांना महागाईचा पुन्हा झटका ; उद्यापासून दुधाचे दरवाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ डिसेंबर २०२२ । राज्यात महागाई दिवसेदिवस वाढत असतांना पुन्हा नागरिकांना मोठा झटका बसला आहे. मदर डेअरी च्या दूध दरात उद्यापासून वाढ करण्याचा निर्णय कपंनीने जाहीर केला आहे. यावर्षी मदर डेअरीकडून दूध दर वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे.

 

कंपनीने जाहीर केलेल्या निर्णयानंतर मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीकडून केली जाणारी ही दरवाढ उद्यापासून अंबलात आणली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीकडून करण्यात येणारी ही दरवाढ दिल्ली-एनसीआरमध्ये केली जाणार असून, मंगळवारपासून दिल्ली-एनसीआर बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. मदर डेअरी दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज 30 लाख लिटरपेक्षा जास्त प्रमाणात दुधाचा पुरवठा करते. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनंतर मदर डेअरीच्या फुल क्रीम दूधासाठी ग्राहकांना प्रतिलिटर 66 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, टोन्ड दुधासाठी 51 रुपयांऐवजी प्रति 53 रूपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर डबल टोन्ड दूधासाठी 45 रुपयांऐवजी 47 रुपये मोजावे लागणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम