अफगाणिस्तानात पुन्हा भूकंप : हजारो लोकांचा मृत्यू !
बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३
जगभरात गेल्या काही महिन्यापासून अनेक देशांना भूकंपाचे धक्के बसू लागले असतांना आता या दुर्घटनेत अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांचे सर्वाधिक नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. या दुर्घटनेत तब्बल २ हजार लोकांचा मृत्यू झाला. तर जखमी होणाऱ्यांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. दरम्यान अफगाणिस्तान आता परत एकदा भूकंपाने हादरले आहे.
या भूकंपाची तीव्रता ६.३ रिक्टेर स्केल नोंदवली गेली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (युएसजीएस) नुसार, अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाचे केंद्र हे राजधानी हेरातपासून ३४ किलोमीटरच्या दूर आहे. जमिनीच्या ७ ते ८ किलोमीटर खोल हे केंद्र होते. हा भूकंप जागतिक वेळेनुसार, ०३.३६ वाजता आला होता. येथील नागरिकांना साधरण २० मिनिटापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.
दरम्यान अफगाणिस्तानमध्ये बहुतेकवेळा शक्तीशाली भूकंप आले आहेत. परंतु अफगाणिस्तानमध्ये इतक्या प्रमाणात भूकंप का येत आहेत. याचे सर्वात मोठं कारण म्हणजे अफगाणिस्तान हे युरेशियन प्लेटच्या दक्षिणी सीमेजवळ आहे. यामुळे भूकंपाचे केंद्र स्थान अफगाणिस्तान असते. तसेच हा परिसर डोंगराळ भागाचा आहे. यामुळे येथे जास्त नुकसान होत असते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम