दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून यात महाविकास आघाडी भरपूर ठिकाणी बाजी मारल्याचे चित्र समोर आल्यानंतर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजप शेतकरी विरोधी आहे. महागाईच्या माध्यमातून जगणे मुश्किल करून ठेवले आहे. देशात भाजप विरोधी लाट आहे. भाजप विरोधातील चित्र पाहायला मिळत आहे. बाजार समितीत हेच चित्र दिसत आहे” अशी टीका नाना पटोले यांनी केली. “भंडाऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजप सोबत होते. एक-दोन ठिकाणी असं होऊ शकतं. मात्र राज्यात भाजप विरोधी लाट आहे. बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपा विरोधात राग पाहायला मिळत आहे” असं नाना पटोले म्हणाले.
“जर तर मध्ये आम्हाला जायचे नाही, अवकाळीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. जनतेचे प्रश्न आज महत्वाचे आहेत. आजची स्थिती लक्षात घेऊन काम करावे. बेरोजगारीवर सरकार का बोलत नाही? महाराष्ट्राचा तमाशा चालवला आहे. काँग्रेसकडून सीएम बाबत कुठलेही वक्तव्य आलेले नाही, आता कुठलीही निवडणूक नाही, जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आवाज उठवत राहणार, असं नाना पटोले म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम