अभिनेत्रीला सोडून बॉडीगार्डवर चाहते फिदा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ देशातील सर्वच अभिनेते असो वा अभिनेत्री भरपूर बॉडीगार्डच्या ताफ्यात ते नेहमी दिसून येतात पण काही अभिनेते व अभिनेत्रीचे बॉडीगार्ड कधीही बदल होताना दिसत नाही, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. देशी गर्ल प्रियंका चोप्रा ३ वर्षा नंतर माहेरी आली म्हणजेच भारतात आली आहे. ती भारतात आली की तिच्या चाहत्यांसाठी दसरा दिवाळीपेक्षा मोठा सणअसतो. पण आता प्रियंकापेक्षा तिचा बॉडीगार्ड जास्त चर्चेत आला आहे.

प्रियंका चोप्रा सध्या भारतात आली आहे. ती तिच्या हेअर प्रोडक्टचे प्रमोशन करण्यासाठी आली आहे. प्रियंका मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दिसली. यादरम्यान प्रियंकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी प्रियंकापेक्षा तिच्या बॉडीगार्डवर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत. प्रियंका मुंबईतील ताजमध्ये दिसली जिथे संपूर्ण मीडिया तिला कव्हर करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी प्रियंकाच्या सोबत तिचा बॉडीगार्ड होता, जो खूपच स्टायलिश आहे. बॉडीगार्ड प्रियंकाला मीडियापासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत बॉडीगार्डची अदा, स्टाईल, लूकने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. सगळीकडे फक्त प्रियंकाच्या बॉडीगार्डचीच चर्चा होत आहे. एवढेच नाही तर प्रियंकाच्या चाहत्यांनी बॉडीगार्डबद्दल भरभरून कमेंट दिल्या आहेत.

 

एका यूजरने लिहिले – ‘प्रियंकाचा बॉडीगार्ड रायन रेनॉल्ड्ससारखा दिसत आहे’. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने त्याला डेडपूलसारखे संबोधले आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, ‘प्रियंकाने बॉडीगार्डही अमेरिकेतून आणला आहे की काय? .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम