
APK फाइल पाठवून व्यावसायिकाला ४.६४ लाखांचा गंडा
APK फाइल पाठवून व्यावसायिकाला ४.६४ लाखांचा गंडा
जळगाव प्रतिनिधी शहरातील रिंगरोड येथील एका व्यावसायिकाला व्हाट्सअॅपवर पाठवलेल्या बनावट अॅपद्वारे ४ लाख ६४ हजार ४३९ रुपयांची मोठी फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी (९ ऑक्टोबर २०२५) घडली. या प्रकरणी शनिवारी (११ ऑक्टोबर) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हे कुटुंबासह राहून खासगी व्यवसायात गुंतलेले आहेत. ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर “कस्टमर सर्व्हिस सपोर्ट” नावाचे APK फाइल पाठवले. त्यानुसार, पीडिताने अॅप डाउनलोड केल्यानंतर UPI ट्रान्झॅक्शनद्वारे त्यांच्या बँक खात्यातून एकरकमी ४,६४,४३९ रुपये काढले गेले.
या फसवणुकीची कल्पना येताच निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम