जिल्हा युवा मंडळ 2021-22 पुरस्काराकरीता नेहरु युवा केंद्रामध्ये अर्ज करावे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र जळगाव व्दारा 2021-22 या वर्षासाठी विकासात्मक कार्यात उल्लेखनिय कार्य करणा-या युवा/महिला मंडळास जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मडळ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 25000/-(रुपये पंचवीस हजार फक्त) व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहील. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप प्रथम रु. 75000/-, व्दितीय 50000/- व तृतीय रुपये 25000/- असे आहे.

राज्य स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकरीता शासनास पाठविण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार निवडण्यात येतील त्यात प्रथम पुरस्कार रुपये -300000/-(रुपये तीन लाख) व्दितीय पुरस्कार रु.100000/-(रुपये एक लाख) आणि तृतीय पुरस्कार रुपये 50000/- (रुपये पन्नास हजार) व प्रमाणपत्र असे आहे.

तरी जिल्हयातील इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळ विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 डिसेंबर, 2022 पर्यंत नेहरु युवा केंद्र जळगाव कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र जळगाव प्लॅाट नं. 60, मानराज पार्क, जळगाव, दुरध्वनी क्र. 0257-2951754, email qnykjalgaon@gmail.com येथे सपर्क साधावा. अर्जाचा नमुना विनामुल्य नेहरु युवा केंद्र कार्यालयातून मिळेल . असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम