तुफान मेहनतीनंतर अप्पी कलेक्टर झालीच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ एप्रिल २०२३ ।  राज्यात सध्या ऑफिसर्स टेलीव्हिजनवर ११ आणि १२ एप्रिलच्या भागात पाहिलं अप्पीचा interview जेष्ठ विशेष सरकारी वकील ‘उज्वल निकम’ आणि लेखक आणि IAS ऑफिसर ‘विश्वास पाटील’ यांनी घेतला, या मालिकेच्या निमित्ताने हे दोन प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसले.

आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. अप्पीचा निकाल येत्या १६ एप्रिलला लागणार असून अप्पीची मेहेनत फळास येणार आहे आणि ती कलेक्टर होणार आहे आणि त्यानिमित्ताने अर्जुन, छकुली, दिप्या आणि सर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढणार आहेत. अप्पीने तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर झाली आणि या संघर्षात तिला खरी साथ मिळाली ती म्हणजे तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या यांची. तेव्हा पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ १ तासाचा विशेष भाग १६ एप्रिल संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम