इंटरनेटवर कनेक्ट आहात ; यांच्यापासून रहा सावध !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । सध्या भरपूर ठिकाणी कोणत्या ना कोणत्या मार्गी आपला थेट संपर्क हा सायबर चोरट्याशी येत असतो व याच्यात भरपूर लोकाची फसवणूक हि झालेली आहे. यामुळे यापासून नक्कीच आपण दूर राहायला हवे. सध्याच्या घडीला प्रत्येक काम हे डिजिटल होत आहे. प्रत्येक काम थेट इंटरनेटशी कनेक्ट झालेले आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसेल तर प्रत्येक महत्वाची कामे रखडतात. दरम्यान, इंटरनेटच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे हे सायबर चोरट्याच्या फसवणुकीचे अड्डेही बनले आहेत.

सायबर चोरटे अशा वापरकर्त्यांना फसवणूक करण्यासाठी लक्ष करतात, ज्यांना इंटरनेटचे बारकावे माहित नाहीत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. जर निष्काळजीपणा केला तर तुम्हीही फसवणुकीला बळी पडू शकता. इंटरनेटवरून आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया…

कोणतही सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या वेळोवेळी नवीन अपडेट घेऊन येत असतात. बर्‍याचदा नवीन अपडेट जुने दोष दूर करतात. अशा परिस्थितीत तुम्हीही या अपडेटची काळजी घेतली पाहिजे. तुमचे ब्राउझर अद्ययावत ठेवल्याने, तुम्ही सायबर चोरट्यांपासून लक्ष्य केले जाण्यापासून बचाव करू शकता. सायबर फसवणूक टाळण्यासाठी टू-स्टेप-व्हेरिफिकेशनसारखे फीचर सुरू करण्यात आले आहे. तुम्ही हे फिचर वापरणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर किंवा तुमच्या बँकिंग सेवांशी संबंधित माहिती उपलब्ध असलेल्या इतर महत्त्वाच्या अकाउंटवर हे विशेष फिचर वापरणे गरजेचे आहे. या फीचरच्या मदतीने कोणतेही लॉक सहजासहजी उघडता येत नाही.

तुमच्या लक्षात आलेच असेल की, जेव्हा तुम्ही इंटरनेटवरील अशा कोणत्याही वेबसाइटला भेट देता जी धोकादायक आहे, तेव्हा लगेच तुमच्या स्क्रीनवर यासाठी अलर्ट येतो. फाइल्स डाऊनलोड केल्यानंतरही अशा प्रकारचा अलर्ट येऊ शकतो म्हणून जेव्हा जेव्हा अशा सूचना स्क्रीनवर दिसतात तेव्हा त्यांना मुळीच हलक्यात घेऊ नका. कारण या फाइल्समध्ये कधीकधी मालवेअर असतात जे तुमच्या PC वर येऊन सायबर चोराचे काम सोपे करू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम