आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत ? ; जितेंद्र आव्हाड
दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे आता राज्यातील पुण्यात पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले असतांना अजून वातावरण खराब न होता निर्णय घेणे गरजेचे असल्याचेहि काही नेते सांगत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. चैत्यभूमी इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले असताना ते मीडियाशी बोलत होते.
आव्हाड म्हणाले, “जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का? आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत असं समजू नका. संपूर्ण कर्नाटकात जर मराठी माणसांचं प्रमाण पाहिलं तर २५ टक्के आहे, १०० टक्के तर इथेच आहेत. बंगळुरुपेक्षा अधिक लोक तर इथं मुंबईत आहेत. आम्ही त्यांना सांभाळून घेतो. आमचा मराठी माणूसच त्यांच्या इडली डोसा खायला जातो. त्यामुळं हे आपलेपण बोम्मईंना तोडायचं आहे का? महाराष्ट्रातील गांव इतर राज्यांत जाण्याच्या मागण्या करायला लागलेत तर हे महाराष्ट्राला अस्थिर करण्याच काम सुरु आहे. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्यामुळं जर माझ्यासारख्या व्यक्तीला कळलं की महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार आहेत तर सर्वकाही राख होईल”
मला वाटतं की खरतरं एव्हाना पंतप्रधानांनी बोम्मईंना सांगायला हवं होतं की शांत बसा. एवढं आक्रमक होण्याची गरज नाही. हा वाद आजचा नाही १९४६ पासून सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दावा दाखल आहे, असं असताना एका राज्याचे मुख्यमंत्री असं कसं बोलू शकतात. खटला सुरु असताना तुम्ही असं विधान करणं चुकीचं आहे, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी माणूस तिथं आहे हे दाखवून देणं सरकारचं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फतच राज्यांची पुनर्रचना झाली. भाषावर प्रांत रचना १९५६ मध्ये झाली. त्यानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदा जे आंदोलन झालं ते मराठी साहित्य संमेलनात झालं होतं. त्याचे अध्यक्ष होतो जत्रम माडगुळकर. त्यांनी ठरावं केला होता की, बिदरी, भालकी, कारवार, बेळगाव आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. यासाठी अनेकांचे जीव गेले पण महाराष्ट्राला मिळालं काय तर केवळ मुंबई. तेव्हापासून बेळगावचे लोक लढत आहेत. त्यांना आम्ही एकटं सोडू शकत नाही. त्यांच्यासोबत सर्व मराठी माणंस उभे आहेत हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम