तणावात आहात का ? हे चॉकलेट करा ट्राय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ ।  प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची नेहमी काळजी घेत असतो. त्याच प्रमाणे तुम्ही नेहमीच काम करताना ताणतणावात येत असतात. त्यामुळे तुम्हाला तणावातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. तुम्ही जर तणावात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे.

तणाव-चिंतेच्या समस्यांवर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. जर याची काळजी घेतली नाही किंवा योग्य उपचार केले नाहीत, तर यामुळे गंभीर परिस्थितीत नैराश्‍याचा धोका लक्षणीय वाढू शकतो. सर्व लोकांनी त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, चिंता आणि तणाव सारख्या परिस्थितीदेखील एक गंभीर समस्या असू शकते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरू शकते. रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने नैराश्‍याच्या रुग्णांनाही फायदा होण्याची चिन्हे दिसतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने जे लोक वारंवार तणावाखाली असतात त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. डार्क चॉकलेटचा एक मध्यम आकाराचा तुकडा (40 ग्रॅम) दोन आठवडे दररोज खाल्ल्याने ताण हार्मोन कॉर्टिसॉलसह न्यूरोहॉर्मोनल हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते.

ज्या लोकांना तणावाची समस्या आहे त्यांना कॅटेकोलामाइन न्यूरोट्रान्समीटर जास्त असू शकतो. डार्क चॉकलेट हे हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्‍त ठरू शकते. डार्क चॉकलेटमध्ये कोको आहे जो प्रभावी अँटिऑक्‍सिडंट्‌स (फ्लॅव्होनॉइड्‌स) चा समृद्ध स्रोत आहे, ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी 30 निरोगी प्रौढांमध्ये दोन आठवडे दररोज सुमारे 40 ग्रॅम गडद चॉकलेट खाल्ल्याच्या परिणामांचे मूल्यांकन केले.
दररोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने या सहभागींमध्ये तणाव संप्रेरकांची पातळी कमी होते. डार्क चॉकलेटचा आतड्यांमधील चयापचय आणि बॅक्‍टेरियाच्या क्रियाकलापांवर सकारात्मक प्रभाव पडतो. डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यासाठी दोन प्रकारे काम करते. प्रथम, त्यात फ्लेव्होनॉल्स नावाचे रासायनिक संयुगे असतात जे मेंदूच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करतात, मेंदूला शांत करतात आणि प्रतिक्रिया वेळ आणि स्मरणशक्‍ती सुधारतात. फ्लेव्होनॉल्स मेंदूमध्ये रक्‍तप्रवाह वाढवतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. दुसरे, डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटिऑक्‍सिडंट्‌स रक्‍तदाब कमी करण्यासाठी आणि रक्‍ताभिसरणाला चालना देण्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे तणावातूनही आराम मिळतो.

मेंदूला निरोगी ठेवण्यासोबतच डार्क चॉकलेटचा आपल्या आरोग्याला इतरही अनेक प्रकारे फायदा होतो.हे अँटिऑक्‍सिडंट म्हणून काम करते. शरीरातील उच्च रक्‍तदाब आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील याचे फायदे आहेत. बॅड कोलेस्टेरॉल कमी करून ते हृदयविकाराचा धोका कमी करते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम