“तुमची मुले नीट वागतात का?”, अजित अजित पवारांचा बांधकाम व्यावसायिकांना सवाल

बातमी शेअर करा...

बारामती येथील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना “तुमची मुले नीट वागतात का?” असा सवाल केला. पवार यांनी पुण्यातील अपघाताचा संदर्भ देत, मुलांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांच्या योग्यतेची खात्री करण्याचा सल्लाही दिला.

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने महागडी मोटार चालवून अपघात केल्यामुळे दोन अभियंते दगावले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पालकांना मुलांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली. “चुका केल्या तर कायदा कोणालाही सोडणार नाही,” असेही ते म्हणाले.

विकासकामांची पाहणी

अजित पवार यांनी बारामतीतील गरुड बाग, क्रीडा संकुल, आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या विकासकामांची पाहणी केली. “विकासकामे वेळेत आणि उत्तम प्रतीची असली पाहिजेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आणि नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम