आधी वाद घातला अन राखीने गळाभेट घेतली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही महिन्यापासून आपल्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री राखी सावंतने नुकतेच आपल्या नवऱ्यासोबत लग्न करून त्याला नंतर तुरुंगात पाठविले तर त्याआधी एकमेकांविरोधात बोलणाऱ्या राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा मैत्रिणी झाल्यात. शर्लिन चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिल दुर्रानीला पाठिंबा दिला होता आणि राखी सावंतला फटकारले होते, मात्र आता तिने युटर्न घेतला आहे. आता शर्लिन चोप्रा राखी सावंतसोबत दिसली आहे.

फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केलेल्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओवर राखी सावंत आणि शार्लिन चोप्रा एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा राखी सावंतला म्हणते, ‘राखी, तुला तुझ्या आयुष्यातील राजकुमार सापडला आहे, मग तू आनंदी का नाही? तुझ्या आयुष्यात एंट्री केलेल्या राजकुमार ठग असल्याचं कळतंय. जो लोकांना मूर्ख बनवतो, लोकांना फसवतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम