आर्यन खान व न्यासा देवगनने केली दिवाळी पार्टीत धमाल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ ।  देशातील अनेक अनेक स्टार्सनी दिवाळीच्या आधीच घरी प्री-दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे सर्व बडे स्टार्स आणि त्यांची मुले पोहोचली. या दिवाळी पार्टीचे काही आतले फोटो आता समोर आले आहेत. एका फोटोमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अजय देवगणची लाडकी मुलगी न्यासा देवगन एकत्र पार्टी करताना दिसत आहेत.

 

 

या फोटोंमधील दोघांचं बॉन्डिंग पाहून असे म्हणता येईल की दोघंही खूप चांगले मित्र आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सर्वांच्या नजरा आर्यन आणि न्यासावर खिळल्या आहेत.

अमृतपाल बिंद्राच्या दिवाळी पार्टीत दिसला
दिवाळीच्या आधी, चित्रपट निर्माते अमृतपाल बिंद्रा यांनी त्यांच्या घरी एक भव्य प्री-दिवाळी पार्टी दिली. या पार्टीचे आतले फोटो आता ओरहान अवत्रामणीने शेअर केले आहेत. विशेष म्हणजे जान्हवी कपूरला डेट केल्याच्या बातम्यांमध्ये ओरहानचे नाव खूप चर्चेत आहे. ओरहानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याशिवाय आर्यन खान, न्यासा देवगन आणि तृप्ती डिमरी दिसत आहेत. अम्रिपाल बिंद्राच्या प्री दिवाळी पार्टीला अनेक स्टार्स उपस्थित होते. ज्यामध्ये कियारा अडवाणी, शाहरुख खान, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, श्नेता नंदा आणि नव्या नंदा यांच्या नावाचा समावेश आहे. अजय देवगणची मुलगी न्यासा अनेकदा तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकने लोकांचं लक्ष वेधून घेते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम