धंगेकर विजयी होताच चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल !
दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । कसबा येथील पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने एवढा प्रचार करूनही त्याचा फायदा भाजपचे हेमंत रासने यांना झाला नाही मात्र काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील हे “Who is Dhangekar?” मी बऱ्याच दिवसांपासून धंगेकरांचं नाव ऐकतोय.. पण हा धंगेकर कोण आहे” असं ते भर सभेत म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाल्याने आता चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केलं जात आहे.
रविंद्र धंगेकर यांना हलक्यात घेण्याची चूक भाजपने केली.
हे कळायला भाजपला बराच वेळ गेला. पण उमेदवारी जाहीर झाल्यापासून धंगेकर यांच्याविषयी मतदारांमध्ये पाॅझिटीव्ह वातावरण होते.#कसबा_पोटनिवडणूक #कसबापेठ #Pune pic.twitter.com/YAt6LHOOw7— Sambhaji Patil (@psambhajisakal) March 2, 2023
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. तर चिंचवड येथे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि भाजपच्या आश्विनी जगताप या उमेदवारांमध्ये लढत झाली. त्याचबरोबर कसब्यामध्ये रविंद्र धंगेकर विरूद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम