राहुल गांधींना खासदारकी मिळताच ‘ती’ जबाबदारी पुन्हा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | देशात मोठ्या अडचणीत असलेले कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना नुकतेच लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर काही दिवसांनी बुधवारी त्यांची संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

काँग्रेस खासदार अमर सिंह यांनाही समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य सुशील कुमार रिंकू यांची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ते एकमेव आप सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पी.पी. मोहम्मद फैजल यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी मार्चमध्ये अपात्र ठरविण्याच्या पूर्वीपर्यंत राहुल गांधी संरक्षणविषयक स्थायी समितीचे सदस्य होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम