शिंदे गटाचे आमदार लग्नात येताच ; ”एकदम ओके, ५० खोके’ घोषणा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मे २०२३ ।  राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून बाहेर गेलेल्या आमदारांना प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते ‘एकदम ओके, ५० खोके’ अशा घोषणा देवून हिणवू लागले आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा एका ठिकाणी लग्नात आलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदाराचा चेहरा पाह्ण्यासारखा झाला होता.

काय आहे घटना ?
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एका लग्न समारंभात चांगलीच गोची झाली. बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांचा चेहरा चांगलाच पाहण्यालायक झाला. मंडप परिसरात सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे संतोष बांगर यांनीही लवकरच पाय काढता घेतला. या घोषणाबाजीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पाथरी तालुक्यातल्या देवेगाव (जि. परभणी) येथे सोमवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला खासदार बंडू जाधव, आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी बंडू जाधव अगोदरपासूनच उपस्थित होते. त्यानंतर आलेले शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे बंडू जाधव यांना चरणस्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. अन् अचानक घोषणाबाजी सुरू झाली.

कार्यकर्त्यांनी आधी, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘बॉस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. तोपर्यंत सारे ठीक होते. मात्र, अचानक त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ची घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा बंडू जाधव यांचे चरणस्पर्श करणाऱ्या संतोष बांगर यांची चांगलीच गोची झाली. त्यांचा अक्षरशः चेहरा ओशाळला. संतोष बांगर यांनी घोषणाबाजी सुरू असताना गप्प राहणे पसंद केले. मात्र, वधू – वर आणि वऱ्हाडी मंडळी कावरी-बावरी झाली. यजमानांची गोची झाली. काही ज्येष्ठांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना आवरले. हे राजकीय व्यासपीठ नाही. लग्नात विघ्न आणू नका, अशी विनंती केली. त्यानंतर घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते शांत झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम