आशियाई बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबीर संपन्न

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी)

येथील शिवरे दिगर येथे आशियाई विकास बँक व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शिवरे दिगर ते तरवाडे रस्त्यावर असलेल्या कंपनीच्या प्लांटवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पारोळा ते काजगाव काँक्रिट रस्त्याचे काम आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने सुरू आहे. त्याच निमित्ताने या शिबिराचे आयोजन अनुश्री ग्लोबल कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने अनिल शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला एडीबी एन्व्हायरमेंटल ऑथॉरिटी इंजिनीअर – टीमचे केंद्रप्रमुख दादासाहेब नलुके, पावनरेखा मिश्रा, तसेच
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर… राऊत ..डेप्युटी इंजिनियर गणेश पाटील व इंजिनीयर अक्षय सावंत तसेच प्रकल्प प्रोजेक्ट मॅनेजर – काशीनाथ बोरसे, प्रकल्पाशी संबंधित वरिष्ट समन्वयक, प्रकल्प केंद्र प्रमुख, उपस्थित होते.
डॉ. भूषण देवरे, अक्षय गव्हाणे, स्नेहा माळी, माधवी चौधरी, हर्षा चौधरी, किशोर भोई या मान्यवरांनी ह्या शिबिरात परिश्रम घेतले.

हे रक्तदान शिबिर या प्रोजेक्टवर काम करणारे कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहकार्यानेच आयोजित केल्या असल्याने या कर्मचाऱ्यातून २६ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून देश कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे. दैनंदिन काम करीत असताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली गेली पाहिजे या उद्देशाने हा कॅम्प यशस्वी झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम