अलिशान गाड्यांचा मालक होता अतिक अहमद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  देशातील उत्तर प्रदेश मधील माफिया डॉन म्हणून परिचित असलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी अतिक आणि अश्रफ यांना आणण्यात आले होते. हल्लेखोरांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा मीडियावाले दोघांची चौकशी करत होते. अतिक अहमद यांच्या डोक्यात गोळी लागली आणि तो जागीच ठार झाला.

पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्लेखोर पत्रकार बनून आले होते. अतिक अहमद यांच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. हत्या करणारे कोण होते हे अजून पुढे आलेलं नाही. अतिक अहमद याची या भागात मोठी दहशत होती. त्याला आलिशान गाड्यांमध्ये फिरायला आवडायचे आणि त्याने आपल्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्या ठेवल्या होत्या. अतिककडे लँड क्रूझर, मर्सिडीज अशा महागड्या गाड्या होत्या. याशिवाय त्याच्या हमर कार होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अतिकने कानपूरमध्ये या कारचा जोरदार फडशा पाडला होता. त्याचा या गाडीचा नंबर 786 होता.

अतीकला रॉबिनहूड प्रमाणे राहायला आवडायचे. त्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि आलिशान वाहनांची खूप आवड होती असेही सांगितले जाते. देशात विकली जाणारी महागडी आलिशान वाहने अतीकच्या ताफ्यात अनेकदा दिसायची. अनेक वेळा तो या महागड्या वाहनांवर स्वार होताना दिसला, तर अनेक वेळा तो ड्रायव्हिंग सीटवरही दिसला.

अतिकच्या नावावर फक्त ५ कार होत्या. यामध्ये 1991 मॉडेल टोयोटा लँड क्रूझर, 1990 मॉडेल मारुती जिप्सी, 1993 मॉडेल महिंद्रा जीप, 1993 मॉडेल पियाजिओ जीप आणि 2012 मॉडेल पजेरो कार यांचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी गेल्या महिन्यातच त्याच्या काही आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. काही गाड्या त्याच्या नावावर नव्हत्या. पण त्याच्या ताफ्यात अनेक गाड्यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम