औरंगजेब या मातीतले नाहीत का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मार्च २०२३ । गेल्या दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांनी अटक केली आहे.

या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सल्तनत मध्येच झाला. फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये विभाजन घालायचे ते विरोधात बोलत असावेत. जात, धर्म राजकारण झालं की प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एआयएमआयएमने औरंगजेबाचे फोटो झळकावले. औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होते. यामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही मात्र औरंगजेबाचे झळकवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांनी कारवाईची मागणी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम