ऑस्ट्रेलियन सरसावले मदतीसाठी; विधवा, गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप
बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना शाश्वत उपजीविकेची संधी मिळावी यासाठी ऑस्ट्रेलिया येथील भारतीय बांधवांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून कृती फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा व अन्य महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.ऑस्ट्रेलियातील भाऊसाहेब पाटील, जय श्रीराम मित्र मंडळ, शेखर महाजन यांनी लिवरपूल सिडनी येथे बाईपण भारी देवा ह्या सिनेमाच्या शो चे आयोजन केले होते. या मधून जमा झालेला निधी तसेच मराठी स्वाद ऑस्ट्रेलियाचे चे योगेश चव्हाण, मराठी कट्टा ऑस्ट्रेलियाचे विवेक खलाने, राजीवजी चांदुरकर व कल्लोळ धर, ऑस्ट्रेलिया येथील भाऊसाहेब पाटील, त्यांचे जय श्रीराम ग्रुप मित्र मंडळी, राहुल पवार, राजेश पाटील, सचिन झुंजे, स्वप्नील पाटील, विक्रम पवार, विशाल गोकुळे. योगेश चव्हाण, जय गायकवाड, दीपक इंगळे, विनायक वेल्हाळ संदीप घोजगे अमोल भालेराव, राजू चव्हाण, आनंद शिंदे, कमलेश फाठक संतोष मते, योगेश दड्डीकर ह्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भरपूर मदत केली. त्यामुळे आर्थिक निधी उपलब्ध करायला सोयीचे झाले.
जळगांव शहरासह भुसावळ, चाळीसगाव तालुक्यातील झोपडपट्टी वस्ती मध्ये राहणाऱ्या अतिशय गरजू आणि उत्पन्नाचे कुठलंही साधन नसलेल्या महिलांना माधवबाग क्लिनिकच्या डॉ श्रद्धा माळी, कृती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी. टी. महाजन यांचे हस्ते या शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या मशीन वाटप झाल्यानंतर लाभार्थीच्या घरी मशीन पोहचविण्यासाठी 2 मालवाहतूक मिनी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून महिला घरी बसुन रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होऊन स्वतःच्या परिवाराचा सांभाळ करू शकतील, हा हेतू ठेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित माळी यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ शिंपी यांनी केले तर आभार चेतन निंबोळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश राजपूत, निवेदिता ताठे, विद्या सोनार, भारती काळे यांनी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम