‘अवतार 2’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केली इतकी कमाई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ ।  ‘अवतार 2’ हा हॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट जेम्स कॅमरून यांनी दिग्दर्शित केला असून तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिला भाग ‘अवतार’ हा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागानेही कमाईचे विक्रम प्रस्थापित केले होते. आता दुसऱ्या भागानेही जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. भारतातही या चित्रपटाची भरपूर क्रेझ आहे. ‘अवतार’ हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 2009 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने तुफान कमाई केली होती. 13 वर्षांनंतर प्रेक्षकांमध्ये सीक्वेल पाहण्याची उत्सुकता कायम आहे की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र अवतार 2 ने पहिल्याच दिवसापासून कमाल केली. शुक्रवारी अवतार 2 ने तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता पहिल्या वीकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहिल्यानंतर ‘अवतार 2’ बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचणार असल्याचं दिसतंय.

पहिल्या वीकेंडची कमाई
रविवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने 46 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. तर शनिवारीही 45 कोटींहून अधिक गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांची कमाई 133 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ग्रॉस कलेक्शन म्हणजेच फक्त तिकिटांद्वारे झालेल्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ‘अवतार 2’ने पहिल्या दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला. रविवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन पहिल्या वीकेंडला 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. जगभरातील कमाईचा हाच आकडा 450 दशलक्ष डॉलर्सच्या जवळ गेला आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा जगभरातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचलं होतं.

भारतातील हॉलिवूड चित्रपटांची ओपनिंग कमाई-
1- ॲव्हेंजर्स: एंड गेम- 53.10 कोटी रुपये
2- अवतार: द वे ऑफ वॉटर- 38 कोटी रुपये
3- स्पायडरमॅन: नो वे होम- 32.67 कोटी रुपये
4- ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर- 31.30 कोटी रुपये
5- डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस- 27.50 कोटी रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम