हा आजार असल्यास दुध सेवन करणे टाळावे !
दै. बातमीदार । २५ मे २०२३ । प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तो आपल्या आहारात पाले भाज्या व दुधाचे देखील सेवन करीत असतो पण काही व्यक्तींना दुध देखील त्रासदायक ठरू शकते. जर कोणाला शरीराला सूज येण्याशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी दूध पिऊ नये. कारण दुधात असलेले सैचुरेटेड फॅट हे शरीरातील इन्फेमेशन वाढवतात.
तसंच काही संशोधनात शरीरात सूज निर्माण करण्याचं आणि वाढवण्याचं कारण दूध ठरलं आहे. लिवरशी संबंधित समस्या असलेल्यांनी दुधापासून लांब राहावं. ज्या लोकांना लिवरशी संबंधित काही समस्या असतील त्यांनी दुधापासून लांब राहावं. लीवरशी संबंधित समस्या असतील तर दूध नीट पचत नाही, त्यामुळे लिवरला सूज येण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीरात फॅट जमा होण्यास सुरुवात होते.
बर्याच स्त्रियांना मासिक पाळी उशीरा येणे किंवा पीसीओएस सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्त्रियांनी दुधापासून लांब राहीलं पाहीजे. कारण पीसीओएसमध्ये स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल इंबैलेंस होत असतो. त्यामुळे अशावेळी दुधाचे सेवन करू नये. भरपूर लोकांना अपचन, गॅस, कफ सारख्या समस्या होत असतात. अशा लोकांनी दूध पिऊ नये. कारण कमजोर पचनसंस्था असली तर दूध ती समस्या आणखी वाढवते. काही लोकांना दुधाची ॲलर्जी असते. अशा लोकांनी जर दूध पिलं तर त्यांना गॅस, झळझळ, सूज निर्माण होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ॲलर्जी असलेल्या लोकांनी दुधापासून लांबच राहावे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम