वजन कमी करण्याच्या नादात आहार बदल टाळा !
दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ तुमचे वजन वाढले असेल तर तुम्ही नक्की झटपट वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या पदार्थांचे सेवन शरीराला हानिकारक ठरतात. तर ते आरोग्यासाठी हि कधी कधी चुकीचे ठरू शकते. सर्व प्रथम, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जलद वजन कमी करणे हा शरीरावर विपरित परिणाम करतो. वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.
1. प्रत्येकासाठी एकच आहार असतो हा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. तुमच्यासाठी कोणता आहार सर्वोत्तम योग्य राहिल हे ठरवताना तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही खूप सडपातळ असाल, तर तुम्हाला जास्त ऊर्जायुक्त आहाराची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल तर तुम्हाला कमी ऊर्जा असलेल्या आहार फायदेशीर ठरतो.
जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 ची खालावलेली पातळी किंवा तुमचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम करते हे जाणून घेणे आवश्यक आहे.
2. क्रॅश डाएटिंगचे फॅड टाळा. सोशल मीडियावरील विचित्र डाएट फॅड्सचा अवलंब करणे टाळा. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत. तुमच्या शरीराला एकूण सर्वच प्रकारच्या आहाराची गरज असते मग ते गोड, आंबट किंवा कडू असो, परंतु केवळ थोड्या प्रमाणात. सर्वकाही खा परंतु केवळ संयमाने. जर तुम्ही या डाएट फॅड्सचे पालन केले तर तुम्ही कमकुवत होऊन आजारी पडू शकाल.
3. चांगला आणि वाईट असा कोणता प्रकार नसतो. तुम्ही जर आवड्याभरात 100 पौष्टिक पदार्थ खाल्ले आणि केवळ एखादा चटपटीत पदार्थ खाल्ला तर लगेचच तुमच्या शरीरात वाईट परिणाम होणार नाही. संतुलित आहारामध्ये प्रत्येक पदार्थाला स्थान दिले जाते. सर्व पोषक तत्वांचा आहारात समावेश असल्याची खात्री करा आणि आपले ताट नेहमी रंगीत पदार्थांनी भरलेले असू द्या.
4. स्वतःच्या मर्जीने आहार न घेता आहारतज्ञांचा सल्ला घ्या. आहारतज्ञ आणि पोषणतज्ञांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि अभ्यासानंतर या विभागातील पदवी संपादन केली आहे. केवळ आवश्यक प्रमाणपत्रे असलेल्या आहारतज्ञांना “आहारतज्ञ” हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली आहे.
5. फळे, भाज्या, सर्व प्रकारचे धान्य, कार्बोहायड्रेट्स, शेंगदाणे, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश फायदेशीर राहिल. पुरेसे पाणी प्या, भरपूर फळे आणि ताज्या भाज्या खा, तुमच्या प्रत्येक आहारात प्रथिनांचा समावेश करा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम