
जागृती वाचक कट्ट्यावर प्रा. डॉ. वासुदेव वले यांची पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा या पुस्तकावर मीमांसा
भडगाव ( प्रतिनिधी ) : –
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारांचा तौलनिक अभ्यास म्हणजे रावसाहेब कसबे यांचे पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा हे पुस्तकं आहे. गांधींचा साम्यवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक भेद, गांधींचा अस्पृश्यता व हिंदू मुस्लिम यांच्या एक्यासाठीचे प्रयत्न याबाबत कसबे यांनी सदर पुस्तकात परखड विचार मांडले आहेत पण यातील काही प्रश्न कसबे यांनी निरुत्तरीत ठेवले असून त्याची कारण मिमांसा वाचकानी करावी असे पुस्तकाचे शीर्षक आहे असे मत जागृती वाचक कट्ट्यात बोलतांना पाचोरा येथील एम एम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. निलेश पाटील, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. सुवर्णा पाटील ,डॉ. दुर्गेश रुले, श्री. विजय देशपांडे, सौ. वासंती देशपांडे, सौ. रत्ना मराठे, मंडळाचे अध्यक्ष अतुल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. इ ५ ते ७ या गटात प्रथम क्रमांक जावेरिया तसलीमखान (हाजी युसूफखान हाय स्कुल )द्वितीय क्रमांक प्रथमेश मनोज पाटील (लाडकूबाई विद्यामंदिर ) तृतीय क्रमांक राज जगताप (सु. गि. पाटील विद्यालय )यांनी तर इयत्ता ८ ते १० या गटात प्रथम क्रमांक जागृती राजपूत (सु. गि. पाटील विद्यालय )द्वितीय क्रमांक हर्षदा अहिरे (आदर्श कन्या विदयलाय ) तृतीय क्रमांक तानशीला शाबीरबेग (हाजी युसूफ खान हाय स्कूल ) यानी पटकविला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धाकांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.मंडळातर्फे दर वर्षी शालेय विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते यंदाचे हे तिसरे वर्ष असून सदर स्पर्धा मंडळाचे कार्यकर्ते डॉ. नितीन सोनवणे (जळगाव ), प्रशांत जाधव (नाशिक )शरद विसपुते (रावेर ) यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रितर्थ प्रयोजित केली आहे.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा .डॉ. दिपक मराठे यांनी केले . सदर कार्यक्रमासाठी अमोल कासार , सनी पाटील , प्रदीप मासरे , मंदार कासार , दिनेश चौधरी ,मयुर तांबटकर, मृणाल भांडारकर , पृथ्वी परदेशी यांनी परिश्रम घेतले .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम