‘त्या’ वक्तव्याबाबत बाबांचा माफीनामा !
दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबतीत त्यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
काय होते प्रकरण ?
पंतांजली योगपीठचे बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे एका कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 चे कलम दहा (1) (एफ) (एक) आणि (2) के नुसार वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस बजावली होती. बाबा रामदेव यांचे वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचवणारे होते. तसेच या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार महिला आयोगाने रामदेव बाबा यांना तीन दिवसात आपला खुलासा लेखी स्वरूपात पाठवावा अशी नोटीस पाठवलेली होती. त्यावर बाबा रामदेव यांनी स्वतःची बाजू मांडत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. मी कोणताही अपराध केलेला नसून समाजात महिलांना समानतेचा हक्क मिळावा या दृष्टीने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहे.
काय म्हणाले रामदेव बाबा ?
केंद्र सरकार द्वारे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानत सक्रिय सहभाग झालो आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजनात स्वयंसेवी संघटना सोबत ही सहभागी सहभागी झालो आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कधीही कोणताही हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रमात महिला सक्षमीकरणच्या दृष्टीने मी सहभागी झालो होतो. मात्र, माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम