‘ऊंचाई’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह अनुपम खेर, बोमन ईराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणिती चोप्रा, नफीसा अली आणि डॅनी डेंजोंगप्पा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या चित्रपटासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज सकाळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत होता. बिग बींचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. त्यापूर्वी त्यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.
अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच चाहत्यांना हात जोडून चित्रपटगॉहाच जाऊन चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. ऊंचाईपूर्वी बिग बींचा गुडबाय हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे ऊंचाईकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये, असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच त्यांनी केबीसीच्या मंचावरुन प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. अलीकडेच केबीसीच्या मंचावर अनुपम खेर, बोमन ईराणी आणि नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची विनंती केली.
अमिताभ बच्चन म्हणाले होते, “चित्रपटगृहात जाऊन, तिकिट विकत घेऊन चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. कृपया आमचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जा. सध्या कोणी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीये. हात जोडून विनंती आहे की, कृपया तिकिट काढून चित्रपट पाहा.”
या चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचs दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी केलs आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहेत. तसेच या वर्षांत त्यांचे ‘झुंड’, ‘रनवे 34’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुडबॉय’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील ‘ब्रह्मास्त्र’ वगळता इतर सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे आता ‘ऊंचाई’कडून अमिताभ बच्चन यांना फार अपेक्षा आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम