शिंदेंच्या जेवणाला बच्चू कडू यांना निमंत्रण नाहीच !
बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून हा कार्यक्रम वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे आज संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाला, त्यानंतर हे पहिलंच स्नेहभोजन पार पडणार आहे. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
तर स्नेहभोजनाचं निमंत्रण मला नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी निमंत्रण देण्यात आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
‘मला काही निमंत्रण नाही. मला त्याची गरज देखील नाही. ते फक्त कॅबीनेट मंत्री आहेत त्यांनाच बोलवण्यात आलं आहे. आम्ही कॅबीनेट मंत्री नाही म्हणून मला बोलावलं नसेल. पुढे ते म्हणाले की,कॅबीनेट मंत्र्याचा दर्जा असणे आणि मंत्री असणे यामध्ये खूप फरक आहे. हा विषय मी मनाला लावून घेत नाही’, असं ते म्हणालेत. तर मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू म्हणाले की, ‘माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही. शपथ घेणार नाही. झालं तर आम्ही राजकुमारला करू’.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम