बच्चू कडूंचा थेट संभाजी भिडेंना इशारा ; अन्यथा त्याचे गंभीर परिणाम…
बातमीदार | १३ ऑगस्ट २०२३ | महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधावरून राज्याचे राजकीय वातावरण शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी वातावरण तापवलेले असतांना पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. भिडे यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज ऐवजी भगवा झेंडा फडकावा, असा आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून आता राज्यात पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. त्यांनी तिरंगा ध्वजाबाबत दिलेल्या आदेशावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संभाजी भिडे यांना इशारा दिला. भगव्याचा सहारा घेऊन तिरंग्याला डीवचण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कडू यांनी दिला आहे.
अमरावतीत बच्चू कडू यांच्याकडून सायकल तिरंगा सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. अमरावती शहर ते यावली शहीद यांच्या घरापर्यंत सायकल तिरंगा सन्मान रॅली काढणार आहेत. संभाजी भिडे यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा अवमान करू नये. त्यामुळे असंख्य हिंदूवर संशयाची सुई निर्माण होईल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वजासोबतच भगवा ध्वज फडकवू असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यामुळे अमरावती शहरात बच्चू कडू व संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे हे काही दिवसांपूर्वी अमरावती येथे आले असता त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे चे कार्यकर्ते मात्र भगवा ध्वज घेऊन रॅली काढू, असे म्हटल्याने या वादात आणखी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम