भडगाव व पाचोरा तालुक्याला जोडणारा नाचणखेडा रस्त्याची अत्यंत दुरवस्था : जिल्हाधिकारीना शेतकऱ्यांचे निवेदन
प्रतिनिधी | भडगाव :-
महसूल विभागाच्या वतीने आज शुक्रवारी दि. २१ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी नंतर शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकारी यांनी तक्रारी स्विकारल्या. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी अहिरे , तहसीलदार मुकेश हिवाळे, गट विकास अधिकारी रमेश वाघ,, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नायब तहसीलदार रमेश देवकर आदी उपस्थित होते.
भडगाव नाचनखेडा हा रस्ता भडगाव व पाचोरा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. ३०-३५ वर्षा पूर्वी त्यावर थोडे खडीकरण काम झाले होते, मात्र त्यानंतर कोणतेही काम नझाल्याने रस्त्याची आज अत्यंत दुरवस्था झाली आहे.
रस्ता व्यवस्थित नसल्याने वाहने नीट चालत नाही. नाचणखेडा हून भडगाव येथे शिक्षणासाठी मुलांनाही पायपीट करत यावे लागते. पावसाळ्यात विद्यार्थीची शाळा बंद होते तर शेतकऱ्यांचे शेतात जाणे ही मुश्किल होते .
या भागात नाचणखेडा, भडगाव, बाळत खुर्द आदी शेतकऱ्यांची शेती आहे . शेतकऱ्यांना ही प्रवासाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहे.
हा रस्ता जिल्हा परिषद व नगर परिषद हद्दीत असून आज तो मातीत पूर्णतः नाहीसा झाला आहे. त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. अशी मागणी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
निवेदनावर येथील शेतकरी नरेंद्र पाटील, प्रदीप महाजन, सुभाष ठाकरे, नरेंद्र मोरे आदींच्या सह्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम