स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी. फार्मसी महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न..
अमळनेर(आबिद शेख)नॅशनल फार्मसी वीक 2022 अंतर्गत जळगाव जिल्ह्य़ातील डिप्लोमा फार्मसी महाविद्यालये व असोसिएशन ऑफ फार्मसी टिचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विदयमानाने खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली. उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक हेमंतदादा भांडारकर , डी. आर. कन्या शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, सचिव डॉ अरूण जैन, प्राचार्य आर. एस सोनवणे, प्रा. दिपक बारी, प्रा. देवेश भावसार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डि. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांनी केले.
स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाचे नरेश पाटील व विवेक वाघे विजेते, फैजपुर महाविद्यालयाचे राज बारी व अजय पवार उपविजेते ठरले. मुलींमधून ममुराबाद महाविद्यालयाच्या योगिता धनगर व वैष्णवी पाटील विजेते व स्व. पंढरीनाथ छगन शेठ भांडारकर, अमळनेर महाविद्यालयाच्या रोहिणी मगरे व खाटीक अलम या उप विजेत्या ठरल्या. यशस्वी विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उर्वरित स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजना बद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख व माधुरी पाटील , विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, फार्मसी महाविद्यालायचे चेअरमन नीरज अग्रवाल, सदस्य प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, डॉ. अनिल शिंदे, सेक्रेटरी डॉ. अरुण जैन, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोळे यांनी महाविद्यालयीन प्राचार्य, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम