बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची जामीनावर मुक्तता

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची जामीनावर मुक्तता
भडगाव येथे पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 21/01/2023 रोजी गु.र.नंबर 18/2023 नुसार महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, सन 2022 मध्ये तक्रारदार महिलेची भडगाव येथील सागर वैद्य या इसमा सोबत फेसबुक वरून ओळख झाली होती. त्यामुळे सदर महिला व आरोपीचे प्रेम संबंध निर्माण होऊन आरोपीने महिलेस “मी तुझ्यासोबत लग्न करणार असून तुला जीवनभर वागवेल” असे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आरोपीने महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे फोटो व्हाट्सअप वर मित्रास शेअर केले. त्यानंतर सदर महिला गरोदर असल्याचे तिला लक्षात आल्यावर तिने आरोपीस त्याबाबत विचारले असता आरोपीने महिलेस लग्न करू असे सांगितले. परंतु त्यानंतर सदर महिलेने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही, म्हणून महिलेने आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376, 376(2)(n), 354(c) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66(ई)व 67 प्रमाणे बलात्काराची तक्रार दाखल केलेली होती. सदर तक्रारीवरून आरोपीस दिनांक 01/02/2023 रोजी अटक केलेली होती. तेव्हापासून आरोपी कोठडीत होता. त्यामुळे आरोपीतर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी,भडगाव यांनी जळगाव येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून त्यामध्ये “महीलेने दोन विवाह केलेले होते, तिला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी असून तिचे आरोपी सोबत प्रेम संबंध होते, यावरून महीलेने तिचे संमतीने आरोपी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत, त्यामुळे हा शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार होऊ शकत नाही” असा युक्तिवाद केला होता. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची रक्कम रुपये 25000/- चे जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचा आदेश केला. सदर आदेशानुसार आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी यांनी कामकाज चालविले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम