
जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर विकण्यावर बंदी;उच्च न्यायालय !
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची पुन्हा चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी न्यायालयाने पुन्हा नमुने घेऊन ते दोन सरकारी आणि एका खासगी लॅबमध्ये पाठवण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला होणार आहे. या कालावधीत कंपनी पावडरचे उत्पादन करू शकेल, परंतु विक्री आणि वितरणावर बंदी असेल.
मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड (जेजेपीएल) च्या बेबी पावडरच्या नमुन्यांची सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणी करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि एसजी डिगे यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद मोरे यांना सरकारी प्रयोगशाळा किंवा सरकारने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची नावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम