बँकेचा नियम : जास्त पैसे काढल्यास लागणार दंड !
बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
प्रत्येक व्यक्ती आपल्या उद्योगातून किवा पगाराच्या पैश्यातून आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच बँकेचा वापर करीत असतात, आपल्याला गरज असल्या बँकेतून पैसे काढतो. बँकेतून पैसै काढण्यासाठी काही नियम असतात. त्यानुसार तुम्ही पैसे काढू शकतात. पैसे काढताना काही मर्यादा असते. तुम्ही काही ठराविक रक्कम बँकेतून काढू शकता. मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे बँकेचे नियम समजून घ्यायला हवेत. बँकेतून पैसे काढताना एका वर्षात किती रक्कम काढता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अनेकांचा असा समज असतो की, बँकेतून आपण कितीही रक्कम विनामूल्य काढू शकतो. परंतु आयकर कलम 194N अंतर्गत, एखाद्या व्यक्तीने एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली तर त्यांना TDS भरावा लागेल. ज्या लोकांनी सलग ३ वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही त्यांना हा नियम लागू आहे. या लोकांना कोणत्याही बँक, पोस्ट ऑफिसमधून २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. आयटीआर भरणाऱ्या लोकांसाठी हा नियम वेगळा आहे. नियमित आयटीआर भरणारे लोक एका वर्षात १ कोटी रुपयांपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. नियमानुसार, तुम्ही बँक खात्यातून १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के TDS कापला जाईल. जर तुम्ही मागील ३ वर्षांत आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला २० लाखांपेक्षा जास्त पैसे काढल्यावर २ टक्के TDS आणि १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 5 टक्के TDS भरावा लागेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम