‘बाप से बेटा सवाई’ : अर्जुनने रचला नवा इतिहास; सचिनच्या पावलावर ठेवणार पाऊल !
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । जगात क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरने आपले नाव जसे जागतिक पातळीवर नेले तसेच कार्य आता त्याच्या मुलाने सुरु केले तर वावगे राहणार नाही, नुकतीच अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी रचत सचिन तेंडुलकरची मान अभिमानाने ताठ केली. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुनने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने 1988 मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता म्हणजे बाप से बेटा सवाई असे नक्कीच म्हणावे लागेल.
गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. पहिल्या दिवशी राजस्थानने गोव्याचा निम्मा संघा गारद केला होता. मात्र दिवस संपत आला असताना सुयश प्रभुदेसाई आणि रणजी पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर यांनी गोव्याचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अर्जुन तेंडुलकर 12 धावा करून नाबाद होता.
1988 December – Sachin Tendulkar scored his hundred on Ranji debut.
2022 December – Arjun Tendulkar scored his hundred on Ranji debut.
— Johns. (@CricCrazyJohns) December 14, 2022
त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभुदेसाई आणि अर्जुनने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. प्रभुदेसाईने शतक ठोकले तर अर्जुनने लंचपर्यंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत 178 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अर्जुन आणि सुयशने गोव्याचा डाव 5 बाद 201 धावांपासून पुढे नेला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत गोव्याला 140 षटकात 410 धावांपर्यंत पोहचवले. सुयश प्रभुदेसाई हा द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.
अर्जुन तेंडुलकरने देखील आपल्या वडिलांप्रमाणे मुंबईमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरूवात केली. अर्जुनने विविध वयोगटात मुंबईचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याला रणजी संघात स्थान मिळवणे कठिण जात होते. मुंबईचा रणजी संघात प्रचंड स्पर्धा आहे. अर्जुनने मुंबईकडून मुश्ताक अली टी 20 स्पर्धेचे काही सामने खेळला आहे. त्याची मुंबईच्या रणजी संघात देखील निवड झाली होती. मात्र त्याला गेल्या हंगामात अंतिम 11 च्या संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने यंदाच्या मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आता रणजी ट्रॉफीत दमदार पदार्पण करत आपली गुणवत्ता दाखवून दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम