
संत श्री रुपलाल महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व शोभायात्रा संपन्न
पारोळा (प्रतिनिधी) येथील सुर्यवंशी बारी समाज यांच्या वतीने संत श्री रुपलाल महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरास सकाळी 10 वाजता संत श्री रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रतनजी फुसे साहेब (दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क पारोळा एरंडोल विभाग) हे होते तर रक्तदान शिबिरास विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले यात सौ. अंजली करण पाटील – नगरसेवक न. पा. पारोळा तथा महिला व बालकल्याण सभापती, श्री गोविंद शिरोळे – मा. नगराध्यक्ष न. पा. पारोळा, डॉ. श्री राहुल कूवर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी सहभाग घेतला त्यांचे सूर्यवंशी बारी समाजाच्या समाजाच्या वतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले तर रक्तसंकलनाचे कार्य धुळे येथील निर्मल ब्लड बँक यांच्यावतीने करण्यात आले.
शोभायात्रा – सायंकाळी ६:०० वाजता संत श्री रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला प्रतिमापूजन प्रसंगी बारी समाजाच्या वतीने श्री रतनजी फुसे साहेब (दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क पारोळा, एरंडोल) सौ. अंजली करण पाटील – नगरसेवक न. पा. पारोळा तथा महिला व बालकल्याण सभापती, श्री चंद्रकांत पाटील – मा. नगराध्यक्ष न. पा. पारोळा, श्री रोहन मोरे – नगरसेवक न.पा. पारोळा, श्री अमोल शिरोळे – युवा उद्योजक यांची उपस्थिती लाभली त्यानंतर शोभायात्रा बारी गल्ली शिवाजी विभाग येथून मार्गस्थ होऊन हत्ती गल्ली मार्गे कासार गणपती चौक, गावहोळी चौक, मोठा महादेव चौक, मडक्या मारुती चौक मार्गे बारी गल्ली गोंधळी वाडा येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
रक्तदान शिबीर व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी सूर्यवंशी बारी समाजाचे अध्यक्ष – मोतीलाल बारी, उपाध्यक्ष – गणेश बारी, सचिव – परेश सौपुरे, महेद्र बारी, सुनील बारी, राजु बारी, सुरेश बारी, ज्ञानेश्वर बारी, दत्तात्रय बारी, ज्ञानेश्वर त्रांबक बारी, ईश्वर बारी शरद बारी,जितेंद्र बारी, अनिल बारी तसेच उत्सव समिती अध्यक्ष दीपक बारी, उपाध्यक्ष लक्ष्मण बारी, सचिव मनोज बारी यांच्यासह नवयुवक मंडळ व सर्व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम