रोजगार बंद पाडून खाजगीकरणावरच राज्य शासनाचा भर -आ.अनिल पाटील.. वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचे अमळनेरात उद्घाटन..
अमळनेर(आबिद शेख)आहेत ते रोजगार बंद पाडीत खाजगी करणावरच विद्यमान राज्य शासनाचा भर असल्याचे मत आ.अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त करत सावधानतेचा इशाराही दिला,अमळनेर येथील वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या स्व मालकीच्या दुमजली इमारतीच्या उद् घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खाजगीकरणाच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करावाच लागणार असल्याचे आवाहन वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष खामगावचे कॉ. सी.एन.देशमुख यांनी यावेळी केले.येथील जी.एस. हायस्कुल जवळील स्टेट बँक कॉलनीत अमळनेरच्या वीज कर्मचारी सहकारी पटसंस्थेची दुमजली इमारत पूर्णत्वास आल्याने तिचे उद् घाटन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेची नवी टुमदार इमारत उभी ठाकली, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उदगार आमदार पाटील यांनी काढले.यावेळी संस्थापक अध्यक्ष पी.वाय.पाटील यांनी प्रास्तविकात अहवाल मांडला. त्यांनी सांगितले की 2003 साली भाड्याच्या घरात आम्ही ही पतसंस्था ओपन केली. काटकसरीने वागत गेलो. कर्मचारी सभासदांना अडल्यावेळी कर्ज देत गेलो आणि त्यांनीदेखील प्रामाणिकपणे परतफेड केली. म्हणून संस्था प्रगती पथावर आहे.वर्कर्स फेडरेशनचे माजी झोनल सचिव अरविंद देवरे यांनी स्मृतींना उजाळा देताना सांगितले की इकडच्या भागात फक्त चाळीसगावला पतपेढी होती. थोडेसे कर्ज घेण्यासाठी 100 कि.मी. प्रवासकरीत चाळीसगावची फेरी व्हायची.खूप त्रास पुरायचा म्हणून वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय सल्लागार पी.वाय.पाटील यांनी अमळनेरला ही पतसंस्था काढली. नंतर पाचोरा, धरणगाव येथेदेखील स्वतंत्र पतपेढ्या निघाल्या.संस्था जर चांगल्या माणसाच्या हातात गेली तर ठीक; नाही तर बट्ट्याबोळ होणे अटळ असते. पतसंस्था एक साधन आहे.त्यातून आपण कर्ज उचलून प्रगती साधायची असते. खाजगीकरणाचे भूत आपल्या मानगुटीवर आहे. त्याला घालविण्यासाठी वर्कर्स फेडरेशनला लढावे लागणार आहे, अशा शब्दांत ऑडीट कमिशन चेअरमन जे.एन. बाविस्कर, चाळीसगाव, यांनी रोजगाराच्या सुरक्षितेबाबत मार्गदर्शन केले.
राज्यघटनेविरुद्ध पाऊलं टाकणारे हे केंद्र सरकार आहे. कंत्राटी कामगार ठेवणे हे एका अर्थाने खाजगीकरणच आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी दीर्घकाळ लढा दिला.तेंव्हा कुठे ह्या शासनाने केलेले ते 3 काळे कायदे मागे घेतले. समाजवाद शब्द अबाधित राहिला पाहिजे. हे सरकार आभासी प्रगती दाखविते. धर्मनिरपेक्षतेचीदेखील गरज आहेच. आपल्याला संघटीत होवून संघर्ष तर करावाच लागणार आहे. अशा शब्दांत जागृती कॉ.सी.एन.बापू देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून केली.
दरम्यान वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय सल्लागार व्ही.डी. धनवटे, नाशिक, झोनल सचिव कॉ. विरेंद्रसिंग पाटील, एस.आर. खतीफ, शैलेश तायडे आदिंनी मनोगतं व्यक्त केली. वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव नाना पाटील, धुळे, यांनी आभार मानले.या समारंभाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मानद सचिव सुरेश धनगर, चेअरमन रविंद्र पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील, संचालक निलेश गायकवाड, प्रफुल्ल पाटील, शरद पवार, वरीष्ठ लिपिक पंकज भावसार, धर्मरक्षक बावस्कर यांचे योगदान लाभले. कॉ. प्रकाश कोळी, कॉ. अविनाश तायडे, आदिंचे विशेष सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम