तुम्ही ग्रीन टी सेवन करत असाल तर सावधान ; होवू शकतात हे विकार !
दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । आपण हिवाळ्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. स्लिम राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. ग्रीन टी, या उपायांपैकीच एक आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक ग्रीन टीचा आधार घेतात. इतकंच नव्हे तर पटकन बारीक व्हावं या इच्छेपायी अनके व्यक्ती सतत मोठ्या प्रमाणात ग्रीन टीचं सेवन करतात. जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, हे तुम्हाला माहीत आहे ? ग्रीन टीमुळे काय नुकसान होते, जाणून घेऊया.
झोपेत अडथळा – ग्रीन टीमध्ये कॅफेनचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलात तर मेलाटोनिन हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे आपली झोप बिघडू शकते अथवा अपुऱ्या झोपेचा त्रास होऊ शकतो.
डोकेदुखीचा त्रास – ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते. जर तुम्ही दिवसातून 2 ते 3 कप ग्रीन टी पीत असाल तर ते हानिकारक नाही. पण त्यापेक्षाही जास्त ग्रीन टी पीत असाल तर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
पचनाची समस्या – ग्रीन टीमध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास पोटात जळजळ, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता अशा समस्याही उद्भवू शकतात.
ॲनिमिया – जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता निर्माण होते. जास्त ग्रीन टी प्यायल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता वाढते.
उलटी होणे – ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन हेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने आतड्यातील प्रोटीनचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे तुम्हाला उलटी, मळमळ असा त्रास जाणवू शकतो.
ब्लड प्रेशरवर परिणाम – ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्याने ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबावरही खूप परिणाम होतो. खरंतर, ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच तुम्ही हार्ट पेशंट असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ग्रीन टी पिऊ नये.
हाडे ठिसूळ होतात – जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने तुमची हाडं कमकुवत किंवा ठिसूळ होऊ शकतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस यासारखा आजार होण्याची शक्यता वाढते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम