केस रंगवत आहेत तर अशी घ्या काळजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जानेवारी २०२३ सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमात किवा मोठ्या प्रोग्राम मध्ये महिला नेहमी केस विविध रंगात रंगवणे म्हणजेच त्यांना कलर करणे हे खूप कॉमन झाले आहे. काही जण केवळ एखादी बट रंगवतात तर काही जण हायलाइट्स करतात तर काही लोकांना मात्र संपूर्ण केसांचा रंगच बदलायला आवडतो. पण ते केस कलर केल्यानंतर त्यांची काळजी घेताना बरेच जण काही चुका करताना दिसतात. रंगवलेल्या केसांची नीट काळजी घेतली नाही तर रंग तर लवकर निघून जातोच पण आपल्या केसांचेही नुकसान होते. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही कलर केलेल्या केसांची नीट काळजी घेऊ शकाल व त्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.

हेअर कलरवर संशोधन
2010 साली हेअर कलरबद्दल करण्यात आलेले संशोधन एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार कलर करण्यात आलेले केस रोज शांपूने धुतल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. केस कलर केल्यानंतर काही काळाने कलर फेड होणे किंवा हळूहळू की होणे हे स्वाभाविक आहे, पण शांपूचा वापर केल्यास कलर लवकर गायब होऊ शकतो. रिपोर्टनुसार, हे कलर पाण्यात विरघळणारे असतात.
इतके दिवस धुवू नका केस
एका रिपोर्टनुसार, केसांना कलर केल्यानंतर सुमारे 3 दिवस ते धुवू नयेत. कलर केलेल्या केसांमध्ये क्यूटिकल ओपन होतात आणि जर केस धुतले तर त्यातील कलर निघून जातो. त्यामुळे केस रंगवल्यावर काही दिवस शांपूने धुवू नयेत. तसेच कोणताही शांपू वापरू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कलर केलेल्या केसांसाठी मिळतो तोच शांपू वापरावा. त्यामुळे केसांचा कलर जास्त दिवस टिकतो.

कंडीशनरचा वापर करा
केसांचे चांगले पोषण व्हावे यासाठी त्यांना मॉयश्चराइज करणे आवश्यक असते. त्यामुळे केवळ कलर केलेल्या केसांनाच नव्हे तर साथध्या केसांनाही कंडिशनर नियमितपणे लावावे. केसांमधील ओलावा टिकवून ठेवल्याने ते जास्त काळ हायड्रेटेड राहतात.

पाण्याचे तापमान
तज्ज्ञांच्या मते, केस धुताना पाणी खूप गरम असेल तर त्यामुळे केसांचे क्युटिकल्स उघडतात आणि त्यावर लावलेला रंग फिका पडू लागतो. त्यामुळे केस धुताना साधे किंवा कोमट पाणी वापरावे. थंडीतही कलर केलेले केस साध्या पाण्याने धुवावेत. खूप थंडी असेल तर तुम्ही केस धुण्यासाठी दुपारची वेळ निवडू शकता.

ऊन्हापासून करा संरक्षण
कलर केलेल्या केसांचे नेहमी सूर्यप्रकाश किंवा यूव्ही किरणांपासून संरक्षण केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, जर ते सूर्यप्रकाशाच्या अती संपर्कात आले तर केसांचा रंग झपाट्याने फिका पडू लागतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम