थंडीच्या दिवसात व्हायरल इन्फेक्शन होणार नाही याची घ्या काळजी!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ नोव्हेबर २०२२ राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. तर तुम्ही आतापासून सावधान होत त्यावर परिवारातील कुठल्याही सदस्यावर व्हायरल इन्फेक्शन होऊ नये यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे असेल. अशा परिस्थितीत, थंडीच्या ऋतूत आपण थोडे अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण कुटुंबातील एका सदस्य जरी आजारी पडला तरी या व्हायरलमुळे संपूर्ण घर आजारी होते. त्यामुळे काही गोष्टींची आधीच काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून, थंडीचा आनंद तुम्हाला सहज घेता येईल. यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. त्या कोणत्या हे जाणून घ्या.

हिवाळ्यात सांधेदुखीचे अनेक त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हाडांना मजबूत ठेवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून किमान 20 ते 40 मिनिटं चालत राहा. यामुळे तुमची सकाळ प्रसन्नही होईल आणि सांधेदुखीचा त्रासही होणार नाही.

तुमच्यात असलेल्या तणावाची पातळी कमी करणे ही कदाचित सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमचे शरीर सतत तणावाखाली असते, तेव्हा तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती दबावाखाली राहते. ज्यामुळे संसर्गाशी लढा देण्यास तुम्ही सक्षम नसता. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश करा

थंडीच्या सीझनमध्ये फ्लू, सांधेदुखी आणि संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा समावेश करावा. यासाठी तुम्ही आहारात अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड्स देखील घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल.

खूप वेळा खाऊ नका

थंडीच्या दिवसात कार्बचे प्रमाण वाढते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त कार्ब खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोन वाढते. ज्यामुळे तुमचा मूड खराब होतो. म्हणूनच ते खाणे टाळावे. निरोगी नाश्त्यासाठी, तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा समावेश करा आणि तुम्ही फास्ट फूड, चिप्स, चॉकलेटपासून दूर रहा.

शरीर उबदार ठेवा
हिवाळ्यात शरीराची विशेष काळजी घ्यावी. म्हणून, उबदार कपडे घाला, जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल कारण थंडीच्या काळात विषाणूजन्य ताप खूप जास्त असतो.

शरीर हायड्रेटेड ठेवा
बहुतेक लोक थंडीच्या दिवसांत कमी पाणी पितात. परंतु, तुम्ही हे लक्षात ठेवावे की, थंडीतही शरीर हायड्रेटेड ठेवले पाहिजे. कारण असे न केल्यास तुमच्या त्वचेवर, आरोग्यावर आणि केसांवर परिणाम होईल. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्ही खूप सक्रिय व्हाल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम