प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करताय सावधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ फेब्रुवारी २०२३ । सध्याच्या युगात अनेक आजारांचा नेहमी धोका वाढत असतो. त्याचे कारणही तसेच काही असते. चुकीची जीवनशैली आणि अनहेल्दी आहार यांमुळे अनेक आजारांचा धोका वाढतोय. अशातच आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. पण, आजकाल प्लास्टिकच्या बॉटलचा वापर देखील वाढत चालला आहे. एका संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्यास प्राधान्य देतात. जे फार धोकादायक आहे. संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. हा असा आजार आहे, ज्याच्या विळख्यात सध्या भारतातील 8 कोटी लोक आहेत.

संशोधनानुसार, phthalates हे प्लास्टिकमध्ये आढळणारे रसायन आहे, ज्याच्या संपर्कात आल्याने महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. महिलांनी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्यास त्यांना मधुमेहाचा धोका असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. Phthalates रसायने अतिशय धोकादायक असतात, जी प्लास्टिकमध्ये आढळतात. त्याच्या पकडीमुळे महिलांच्या आरोग्यावर बरेच परिणाम होत आहेत. त्यामुळे महिलांनी किमान प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करावा. प्लास्टिकचा वापरही कमी केला पाहिजे.

या संशोधनात असे सांगण्यात आलं आहे की, फॅथलेट्स रसायनांचा महिलांवर खूप परिणाम होतो. Phthalates अंतःस्रावी व्यत्यय आणणारी रसायने आहेत जी अंतःस्रावी ग्रंथींमधून सोडल्या जाणार्‍या संप्रेरकांमध्ये अडथळा म्हणून काम करतात. या संशोधनात अनेक देशांतील 1300 महिलांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांना यामध्ये असं आढळून आले की 30 ते 63 टक्के महिलांना फॅथलेट्स रसायनाच्या संपर्कात आल्याने त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनात असेही आढळून आले की phthalates च्या संपर्कात आल्याने कृष्णवर्णीय महिलांवर परिणाम होत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम