
नागरीकांच्या मागणी नुसार प्रभागात घंटा गाडी सुरु; नगरसेवक निखिल चौधरी यांचा पुढाकार
नवनिर्वाचित नगरसेवक श्री निखिल सुनील चौधरी यांच्या पूढाकाराने काल २२ जाने पासुन नागरीकांच्या मागणी नुसार प्रभागात संध्याकाळी घंटा गाडी चालू करण्यात आली. सकाळी घंटा गाडी ने कचरा उचलला जातो परंतु दिवसभर साचलेला कचरा आणि स्टेशन परिसरात व बाजारात फेरी मारुन कचरा घेणे आणि रात्री दहा वाजता शिवाजी चौकात घंटा गाडी उभी राहणार परिसरातील भाजीवाले व इतर कचरा खाली न टाकता गाडी मधे टाकावे याकरिता श्री निखिल सुनील चौधरी यांनी सोय केली आहे.
अंबरनाथ शहर स्वच्छ शहर मोहीम…
अंबरनाथ पूर्व विभागात छत्रपती शिवाजी महाराज चौकात व स्टेशन परिसरामध्ये नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते, दुकानदार व फेरीवाले बरेच जण तिथे कचरा करतात व इतरही स्टेशन विभागामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, रोटरी शाळा, येथे कचराकुंडी नसतानाही कचरा टाकत असतात. रोज सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान दोन तासासाठी स्टेशन विभाग स्वच्छता मोहीम अंतर्गत घंटागाडी चालवण्यात येणार आहे तरी नागरिकांनी स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
घंटागाडीचा मार्ग:-
5.00 स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ
5.30 झवर हॉस्पिटल
6.00 छत्रपती शिवाजी महाराज चौक
6.30 शिवधाम कॉम्प्लेक्स मेन गेट
6.45 शिवसृष्टी मेन गेट
7.00 शिवमंदिर रोड उगले महाराज यांच्या ऑफिस समोर
7.15 हनुमान मंदिर बी केबिन 7.30 राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक रेल्वे ब्रिज व इतर

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम