तरुणानो सावधान : चुकीच्या सवयीमुळे होवू शकतात नपुसंक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  सध्याच्या तरुणाईला चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अलिकडे अनेकांना नंपुसकतेची समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचेही बोलले जाते. पण ही समस्या का निर्माण होते? याची कारणे काय आहेत? याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. तर याची कारणे आपल्या आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयींमध्येच दडली आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे येते नपुंसकता…

धुम्रपान – स्मोकिंग करणे आज हा अलिकडे ट्रेन्ड झाला असून सोबतच स्टेटसचा भाग झालं आहे.पण स्मोकिंग करुन मिळणारा कूलनेस तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. स्मोकिंगमुळे केवळ कॅन्सर किंवा श्वासासंबंधीच समस्या नाही तर नपुंसकतेचं कारणही ठरु शकते.

मद्यसेवन – जास्त मद्य सेवनामुळेही नपुंसकता येऊ शकते. मद्य सेवनामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरात व्यवस्थित रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे नपुंसकता येऊ शकते.

सप्लिमेंट्स – शरीरात जर काही तत्वांची कमतरता असेल तर काही लोक सप्लिमेंट्स घेणे सुरु करतात. पण हेच सप्लिमेंट्स नपुंसकतेचं कारण ठरु शकतात.

चिंता – आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस आणि टेन्शन सतत तुमचा पाठलाग करतं. लोकांच्या आहारातही फार बदल झाला आहे. या स्ट्रेसचा प्रभाव फर्टिलीटीवरही पडतो आणि यामुळे नपुंसकता येऊ शकते.

पुरेशी झोप – जर तुम्ही कामाच्या तणावामुळे किंवा वेळेअभावी पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यात नपुंसकता ही एक गंभीर समस्या आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम