तीन डंपर प्रकरणी ६ वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा

भडगाव तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा...

तीन डंपर प्रकरणी ६ वाळूमाफियांविरुद्ध गुन्हा
भडगाव तालुक्यातील घटना
भडगाव प्रतिनिधी

चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने काल सकाळी पळासखेडा जवळ अवैध वाळू वाहतुकीचे तीन डंपर काल जप्त केले होते. त्यावर रात्री उशिरा तहसीलदार शितल सोलाट यांच्या आदेशाने भडगाव पोलीस स्टेशनला सहा वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – पाशा अजीज हलकारे क्य 51 धंदा नौकरी रा. मिर्जा चौक टोणगांव ता. भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस विभागा मार्फत अवैध वाळू वाहतुक करुन चोरी करणाऱ्या 3 उप्पर वाहने पकडुन पुढील कारवाईसाठी कार्यालयास पत्रव्यवहार केलेला आहे. त्या अनुषंगाने सदर वाहनानवर गुन्हा दाखल करणे करिता कायदेशीर प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

दरम्यान सदर पोलिस पथकातील पोहेकॉ. संभाजी पाटील, पोहेकों. रविंद्र पाटील, पोकों प्रकाश पाटील असे आम्ही एसडीपीओ कार्यालय चाळीसगांव येथे हजर असतांना एसडीपीओ राजेंद्रसिंह चंदेल यांनी दालनात बोलावुन कळविले की, भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध वाळु करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर स्टाफ खाजगी वाहनाने भडगांव पोलीस स्टेशन हद्दीतील वाक पारोळा रस्त्यावर पेट्रोलींग करत असतांना नालबंदी फाट्याचे पुढे पळासखेडे गावाच्या अलीकडे रोडवर सकाळी 06. 00 वाजेच्या सुमारास भडगांव कडुन तीन डंपर येतांना दिसले.

सदर डंपर वाहनाना रस्त्याच्या बाजुला थांबवुन डंपर पाहणी केली असता त्यातील डंपर क 1) एमएच 18-एच -2255 वाळुने भरलेले दिसते तसेच डंपर क्र 2) एमएच 43-बीपी 7846 हे उप्पर वाळू उपसा करुन आलेले दिसले त्यात वाळुचे अंश दिसुन आले. तसेच डंपर क्र 3) विना नंबर चे टाटा कंपनीचे वाळुने भरलेले दिसुन आले. त्यावरील चालक यांना वाळू वाहतुकी बाबत परवाना विचारपुत करता त्यांनी कोणताही परवाना नसल्या बाबत कळविले आहे मिळुन आलेल्या वाहनानचे सविस्तर वर्णन खालील प्रमाणे.

1)520000/-रुपये किमतीचे टाटा कंपनीचे पांढ-या निळ्या रंगाचे डंपर वाहन क एमएच 18-एच -2255 वाळुने अंदाजे पाच ब्रास भरलेले जु. वा अनिकेत दिपक कोळपकर यांच्या मालकीचे चालक उमेश विजय सोनवणे यांच्या ताब्यात मिळुन आले. म्हणुन संशयित आरोपी 1)उमेश विजय सोनवणे 2) सागर गोकुळ पाटील 3) प्रविण संजय पाटील 4) अनिकेत दिपक कोळपकर 5)संतोष रामदास पाटील 6)सागर रविंद्र ह्याळींगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, 303 (2), 48 (7) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, 48 (8) (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. विजय जाधव हे करीत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम