भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त विविध राजकिय पक्षांचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांचा सन्मान

बातमी शेअर करा...

भडगाव – प्रतिनिधी

महाराष्ट्र पत्रकार संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ यांचे वतीने तालुक्यातील विविध राजकिय पक्षातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सन्मान पत्रकार संघातर्फे नुकताच करण्यात आला.

प्रांताधिकारी डॉ.विक्रम बादल याच्या अध्यक्षतेखालील मुख्य उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुचिता आकडे, लक्ष्मण भाऊ मंगलकार्याचे संचालक विजय महाजन, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे, राज्य उपाध्यक्ष पत्रकार सुनील पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, भडगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर शिवदास महाजन, यांच्या सह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी डॉ विक्रम बादल यांच्या हस्ते विविध राजकीय पक्ष असलेले तालुका अध्यक्ष यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पत्रकार संघाचे पाल्यांच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाल्यांचा ही सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ विक्रम बादल यांच्या सह, तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रविन्द्र लांडे, यांनी आपआपले विचार मांडून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सागर महाजन यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार राकेश पाटील व पत्रकार रमेश धनगर यांनी केल तर आभार प्रदर्शन पत्रकार राकेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार राज्य उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष सागर महाजन, पत्रकार सुनील कासार, पत्रकार नितीन महाजन, पत्रकार संजय पवार,पत्रकार एस. डी खेडकर आण्णा पत्रकार, अशोक परदेशी, पत्रकार राकेश पाटील, पत्रकार नरेंद्र पाटील, यांच्या सह पत्रकार संघाचे सर्व पत्रकार यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम